खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

विजयी मिरवणुकीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण!

पालकांची लूट !

खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक प्रमाणात दिसतो; मात्र या इंग्रजी खासगी शिक्षणसंस्था पालकांना लुटण्याचे काम नियोजितपणे करत असतात.

सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

प्रवेशद्वाराचा रस्ता रिक्शाचालकांनी अडवल्याने प्रवाशांची गैरसोय !

रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?

लष्करात भरती करण्याच्या प्रकरणी लाच मागितल्याने लेफ्टनंट कर्नलवर पुन्हा एकदा गुन्हा नोंद !

लष्करामध्ये ज्या ज्या विभागात भ्रष्टाचार शिरला आहे, तो बाहेर आला, तरच लष्कराचे वेगळेपण अबाधित राहील !

पुणे येथील ‘रिंग रोड’साठी पात्र ठरलेली ५ पैकी २ आस्थापने वादग्रस्त !

एम्.एस्.आर्.डी.सी.कडून ‘रिंग रोड’चा प्रकल्प हाती घेतला होता. त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ५ आस्थापने पात्र ठरली होती. त्यातील काही आस्थापने ‘निवडणूक रोखे घोटाळा’ प्रकरणातील आहेत.

कराड येथील ६८ ॲकॅडमी विनाअनुमती !

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच या अनधिकृत ॲकॅडमींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती !

असे करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांनाही कंत्राटदारासह कारागृहात डांबायला हवे !

नागपूर येथील ‘आर्.टी.ई.’ घोटाळ्यात २ पालकांना अटक !

आर्.टी.ई. घोटाळ्याचे अन्वेषण करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने २ दिवसांपासून धाडसत्र चालू केले होते. पथकाने या प्रकरणातील मुख्य शाहिद शरीफ याने उघडलेल्या समांतर खासगी आर्.टी.ई. कार्यालयावर धाड घातली होती.

पुरणगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील अवैध उत्खनन प्रकरणी ग्रामस्थांनी काम बंद पाडले !

तहसीलदार सुनील सावंत यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाळू घाटात कंत्राटदाराने किती वाळूचा उपसा केला, याची पडताळणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी दुपारी नदीपात्र सोडले.