वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली !

वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली, असे मत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातील विशेष न्यायालयाने (‘पी.एम्.एल्.ए.’ने) नोंदवले आहे.

रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत.

पेपरफुटी आणि कॉपी यांविरोधात कठोर कायदा करावा ! – काँग्रेसची राज्‍यपालांकडे मागणी

पेपरफुटी आणि कॉपी या माध्‍यमांतून होणार्‍या नीत्तीमत्तेच्‍या र्‍हासाला आतापर्यंत देशावर राज्‍य केलेली काँग्रेसच उत्तरदायी !

जिओ आस्थापनाकडून वाई (जिल्हा सातारा) शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी !

केबल टाकणे आणि गळती काढणे या कामांसाठी जिओ आस्थापनाने वाई शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. या कृतीचा समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबईतील वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

केवळ निलंबन नको, तर बडतर्फीची कारवाई हवी !

मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

देवतेची उपासना आणि भक्‍ती करणे, हे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे. विश्‍वस्‍तांची दुष्‍कृत्‍ये मंदिरातील रूढी, परंपरा, पूजापद्धत आणि उत्‍सव बंद करण्‍यास कारणीभूत ठरणार असतील, तर ते महापाप आहे. त्‍याला प्रायश्‍चित्त नाही.’

‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी हवी !

ज्‍याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्‍या खेळावर बंदी घालून त्‍या माध्‍यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्‍याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अ‍ॅप्‍स’वर बंदी आणणे अत्‍यावश्‍यक आहे. राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्‍यमांद्वारे अशा ‘अ‍ॅप्‍सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

सिंधुदुर्ग : डिगस येथे बांगलादेशी नव्हे, तर बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील नागरिकांच्या अर्जांचा समावेश

बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सूचीत बांगलादेशी नागरिकांची नावे आल्याने जिल्ह्यात खळबळ !

केवळ योजनेतून नावे रहित करून लाभ नाही. त्यासाठी या बांगलादेशींवर प्रशासन कारवाई करणार कि नाही ? तसेच ऑनलाईन पद्धतीचा अपलाभ घेऊन ज्यांनी ही नावे डिगस गावात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.