कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून अवैध मांसविक्री करणार्‍यांवर कारवाई

एकूण १५ किलो मांस जप्त

ठाणे, ६ जुलै (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून अवैध मांसविक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. बाजार समितीच्या अनुमतीविना मांसविक्री करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ५ जुलैला कारवाई करण्यात आली आहे.

शौकत कुरेशी आणि अन्य कामगार अवैधरित्या मांसविक्री करत होते. बाजार परवाना पथकाने तेथे धाड घालून १० किलो मांस जप्त केले, तसेच दुकानाचा गाळा सील केला. यापूर्वीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध अवैध धंदे करण्याचे धाडस करतात. – संपादक) गफूर डॉन शाळेच्या शेजारी युसुफ गौसू शेख याच्या दुकानातूनही ५ किलो मांस जप्त करण्यात आले असून तो गाळा सील करण्यात आला आहे.