एस्.टी. कर्मचारी चर्चा करण्यास सिद्ध !

गेल्या ३ मासांपासून एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील ८ दिवसांपासून मुंबईत एस्.टी. कर्मचार्‍यांच्या बैठका चालू आहेत.

सोलापूर विभागातील बससेवा हळूहळू पूर्वपदावर !

मागील ३ मासांपासून सोलापूर बसस्थानकासह राज्यभरातील बस बंद होत्या; मात्र आता सोलापूर विभागातील बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

एस्.टी.च्या शेकडो प्रशिक्षणार्थ्यांकडून नियुक्तीसाठी परिवहनमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २०१९ या वर्षी विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवून १ सहस्र ८०० जणांना प्रशिक्षण दिले होते; मात्र गेली २ वर्षे या प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले.

‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्‍यांचा संप लांबवला जात आहे.

योग्य निर्णय आल्यास एस्.टी. महामंडळाचे विलीनीकरण करू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कर्मचार्‍यांना पदनिहाय वेतनश्रेणीसह ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याविषयी एस्.टी. चालू झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

बीड येथे एस्.टी. बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात !

अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक यांचा चुराडा झाला असून बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवण्यात आली होती. घायाळ झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची एस्.टी. संपातून माघार !

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप मागे घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी दिली.

आणखी ११ एस्.टी. कर्मचारी बडतर्फ, संपकरी ठाम !

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या आणखी ११ कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बडतर्फ केले आहे. आतापर्यंत २२ कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

मालवण-ओरोस एस्.टी. बसवर आनंदव्हाळ येथे दगडफेक

या वेळी बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह १३ प्रवासी होते; सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. असे असले, तरी बसगाडीच्या काचा फुटल्या.

१३ डिसेंबरपर्यंत कामावर येणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अनिल परब म्हणाले की, आतापर्यंत १० सहस्र कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. सर्व कर्मचार्‍यांना शेवटची संधी म्हणून १३ डिसेंबरपर्यंत कामावर येण्याची मुदत दिली आहे. १३ डिसेंबरनंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांना निलंबित करण्यात येईल.