केवळ हिंदूंचे सण आल्यावरच कोरोनाची कशी आठवण होते ? – नितेश राणे, आमदार, भाजप

विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना मध्येच ‘ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा सणानिमित्त शहरात फेरी निघते, त्या वेळी कोरोनाच्या दृष्टीने लोकांना काही त्रास होणार नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय देहली येथे हालवण्याचा कोणताही निर्णय नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी देहली येथे हालवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

२९६ रोग वगळून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने येणार !

ज्या रोगांवर उपचार घेतले जात नाहीत, असे २९६ रोग वगळून पुढील मासात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने आणण्यात येईल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !

‘इन्फल्युएंझा’ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मास्क घालावा कि नाही, याविषयी शासनाची भूमिका काय आहे ? ‘महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘आता मास्क घालण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य केले आहे.

पारंपरिक मासेमारांची हानी टाळण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदी आणावी !

मंत्री मुनगंटीवार यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषय योग्य पद्धतीने हाताळले आहेत. त्यामुळे एल्.ई.डी. मासेमारीचा विषय त्याच पद्धतीने हाताळावा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील पारंपरिक मासेमारांची यातून सुटका करावी.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची होणार ‘ड्रोन’द्वारे होणार पहाणी ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मे २०२३ पर्यंत महामार्गाची एक लेन पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल.

‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गरीब रुग्णांना सवलत न देणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार !  – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

देवस्थानांच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.