विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – आशिष शेलार, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन साहाय्य करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या काळात केल्या, त्याचे काय झाले ? याचे उत्तर आधी द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावेत, अशी टीका त्यांनी केली विधानसभेत केली.

अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीचे प्रावधान केले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे……

Land Jihad Waqf Board : सोलापूर आणि मालेगाव येथे वक्फ बोर्डाकडून भूमी जिहाद ! – आमदार गोपीचंद पडळकर

काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेला ‘वक्फ कायदा १९९५’ यासाठी कारणीभूत आहे. हिंदूंच्या आणि देशाच्या मुळावर उठलेला हा काळा कायदा रहित केल्याखेरीज धर्मांध मुसलमानांकडून चालवल्या जात असलेल्या प्रयत्नांना खिळ बसणार नाही !

विरोधकांचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ फेब्रुवारी या दिवशी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. ‘कापसाला प्रति क्विंटल १४ सहस्र रुपयांचा भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधकांनी केली.

काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नावरून मांडलेल्या सूत्रांवर भाजपच्या सदस्यांचा आक्षेप !

मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा असून तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

…तर विधानसभेसह आपण नष्ट होऊ ! – नितेश राणे, आमदार, भाजप

मुंबईमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे. त्याच्या लगत असलेल्या भिंतींजवळ अनेक अतिक्रमणांतून इमारती उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, याकडे सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे विधान भाजपचे सदस्य नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केले.

मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांचे ‘विशेष अन्वेषण समिती’द्वारे अन्वेषण करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा ही अतिशय चुकीची आहे.आंदोलनांच्या वेळी येणारे जेसीबी कुणाचे ? ते कोणत्या कारखान्यांतून येतात ? त्यांच्यामागे कोण आहे ? पैसा कुठून येतो ? याची विशेष अन्वेषण समिती नेमून अन्वेषण झाले पाहिजे.

अयोध्या आणि श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार ! – अर्थमंत्री अजित पवार

राज्यातील भाविक आणि पर्यटक यांना अल्प दरात उत्तम अन् सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीरामजन्मभूमी अयोध्या, तसेच श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८ सहस्र ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून चालू झाले. पहिल्या दिवशी विधानसभेत ८ सहस्र ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. २७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मान्य केल्या जातील. त्यानंतर दुपारी २ वाजता वर्ष २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

नागपूर येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर उभे रहाणार संत जगनाडे महाराज यांचे स्‍मारक !

नागपूर येथील जगनाडे चौक येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर संत जगनाडे महाराज यांच्‍या भव्‍य स्‍मारकाची निर्मिती करण्‍यात येणार आहे.