सातारा येथे मनसेच्‍या आंदोलनानंतर १३ अनधिकृत दुकान गाळे ‘सील’

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या आंदोलनाची नोंद घेत सातारा नगर परिषदेच्‍या अतिक्रमण विभागाकडून विनाअनुमती उभारण्‍यात आलेले १३ दुकान गाळे ‘सील’ करण्‍यात आले.

मराठी भाषेतील चित्रपटांना प्रतिसाद न दिल्‍यास मराठीची अवस्‍था बिकट होईल ! – अमेय खोपकर, मनसे

नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्‍मपॅम्‍फ्‍लेट’ हा मराठी चित्रपट पहाण्‍यासाठी चित्रपटगृहात केवळ ५ जणच होते. मराठीतले रसिक गेले कुठे ? एका उत्‍कृष्‍ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील, तर कुठे चुकत आहे ?

‘टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

आतापर्यंतच्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याच्या घोषणा वेळोवेळी दिल्या आहेत; मात्र अद्यापही राज्य टोलमुक्त झालेले नाही. टोल हे राजकारणातील अनेकांचे उदरनिवार्हाचे साधन झाले आहे.

समृद्धी महामार्गाच्‍या पथकर नाक्‍यावरील परप्रांतीय कर्मचार्‍यांना मनसैनिकांकडून मारहाण !

या प्रकरणाच्‍या विरोधात मनसेच्‍या नाशिक शहराध्‍यक्षा अक्षरा घोडके यांनी परप्रांतीय कर्मचार्‍यांना मारहाण केली. पथकर नाका बंद केला. येथे कार्यकर्त्‍यांची गर्दी झाल्‍याने महामार्गावर वाहतुकीची झालेली कोंडी पोलिसांनी सोडवली.

मुंबई येथे मराठी महिलेला घर नाकारणार्‍या सचिवाची पदावरून हकालपट्टी !

मराठीजनांवर केला जाणारा अन्याय, तसेच मराठी भाषेची सर्वत्र होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे !

एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

ठाणे येथे राजकीय पक्षांकडून दहीहंड्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन !

निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर राजकारणाचा विचार समोर ठेवून उत्‍सव साजरे करण्‍यापेक्षा ते धर्मशास्‍त्रानुसार साजरे होण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला ! – राज ठाकरेे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची क्षमा मागावी. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला.

यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे, नेते, मनसे

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली रायगड जिल्‍ह्यातील पळस्‍पे ते माणगाव अशी १६ किलोमीटरची पदयात्रा मनसेच्‍या वतीने काढण्‍यात आली आहे. ८ टप्‍प्‍यात मनसेच्‍या वतीने ही पदयात्रा काढण्‍यात आली.