मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘जश्‍न-ए-दिवाळी’ची विद्युत् रोषणाई  हटवली !

कुर्ला येथील ‘फिनिक्स’ या प्रसिद्ध मॉलच्या बाहेर दिवाळी या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्र ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ यांऐवजी चक्क ‘जश्‍न-ए-दिवाळी’ अशी इस्लामप्रमाणे शुभेच्छा देणारी विद्युत् रोषणाईची आरास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांना हटवण्यास भाग पाडली.  

मुंबई विद्यापिठाच्‍या कुलगुरूंना घेराव, विदुषकाचे मास्‍क घालण्‍याचा प्रयत्न !

मुंबई विद्यापिठाच्‍या पदवीधर मतदारसंघाच्‍या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्‍या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्‍या सूत्रावरून महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.

उपोषण सोडा, आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे आवाहन पत्राद्वारे केले. या पत्रात ठाकरे म्हणाले, ‘‘निगरगट्ट आणि असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जिवाची बाजी लावू नका. उपोषण सोडा.

शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘सनातन पंचांग २०२४’चे वितरण !

धर्मकार्यातील एक सहभाग म्हणून ज्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी पंचांगांचे वितरण केले

कामकाजात सुधारणा न झाल्यास कोकणसाठी महाराष्ट्र उठवणार ! –  मनसेचे नेते   

मनसेच्या नेत्यानी म्हटले आहे की, गेल्या १७-१८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने त्याची इतिहासात नोंद झाली आहे.

राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे, टोलवसुलीवर लक्ष ठेवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज्यातील ९० टोलनाक्यांवर मनसेचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर मनसेची करडी नजर असणार आहे

 भेसळयुक्त निकृष्ट पदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा !  

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने अशी कारवाई स्वत:हून करायला हवी !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी फलकांना काळे फासण्याची मनसेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत नागरिकांत स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयीचा अभिमान निर्माण न केल्यानेच सर्वत्र इंग्रजीकरण झाले आहे. स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयी अभिमान नसलेल्या नागरिकांत राष्ट्राभिमानही निर्माण होत नाही, हे जाणा !

परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंदवा ! – मनसेची मागणी

जे सर्वसामान्‍यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

टोलवसुली थांबवण्‍यासाठी राज ठाकरे यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट !

राज्‍यातील टोलवसुलीच्‍या प्रश्‍नाविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.