सातारा, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा शहरातील सदरबाजार, जिल्हा रुग्णालय आणि नूतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात काही व्यावसायिकांनी सातारा नगर परिषदेची अनुमती न घेताच व्यावसायिक दुकान गाळ्यांचे बांधकाम करून व्यवसाय चालू केला होता. या अनधिकृत दुकान गाळ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू केले होते. या आंदोलनाची नोंद घेत सातारा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून विनाअनुमती उभारण्यात आलेले १३ दुकान गाळे ‘सील’ करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअसे आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाला अनधिकृत बांधकाम दिसत नाही का ? |