सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्‍हायला हवे ! – राज ठाकरे, मनसे

राज ठाकरे यांच्‍या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्‍या पहिल्‍या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.

भाजपकडून युतीचा प्रस्‍ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

भाजपने आपल्‍यापुढे युतीचा प्रस्‍ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्‍यामुळे भाजपच्‍या प्रस्‍तावावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्‍यस्‍फोट मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !

प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची अशी अवस्था असतांना इतकी वर्षे होऊनही कोकणी माणूस अजून शांत का ? आपल्या आमदार- खासदार यांना कधीतरी तुम्ही जाब विचारणार कि नाही ?

कळवा (ठाणे) येथील रुग्‍णालयात एका दिवसात १८ रुग्‍णांचा मृत्‍यू !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या सूचनेनुसार राज्‍य आरोग्‍य सेवा समितीचे आयुक्‍त यांच्‍या नेतृत्‍वाखाली एक चौकशी समिती नेमण्‍यात आली आहे. – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त अभिजित बांगर

रत्नागिरी एस्.टी. बसस्थानकाचे ६ वर्षे काम रखडल्याने मनसेने मोर्चा काढून दिली चेतावणी !

आमदार, खासदार नव्हे, तर मंत्री आपले आहेत. मागील ६ वर्षांमध्ये आमदार पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा एस्.टी. बसस्थानकाचा विषय निधीअभावी रखडतो, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.

सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.

‘फास्‍ट टॅग’ असूनही टोलसाठी अमित ठाकरे यांची गाडी थांबवल्‍यामुळे मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांकडून टोलनाक्‍याची तोडफोड !

शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या मंदिरात दर्शन घेऊन अमित ठाकरे नाशिक येथे परतत असतांना त्‍यांना येथील टोलनाक्‍यावर अडवण्‍यात आले.

मनसेच्या नवीन उपक्रमाचा चिपळूण येथे शुभारंभ 

‘नाका तेथे शाखा’ या उपक्रमाचा शुभारंभ पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभहस्ते पार पडला.

मनसेच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रस्टला वन विभागाची ८ दिवसांची समयमर्यादा !

वन विभाग झोपा काढत असल्यामुळेच सरकारजी जागांवर अशा प्रकारे अतिक्रमण होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासह ते होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा !