मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवरात्रीच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील मौजे खेडे, शित्तूरवरूण, उखळू, रेठरे, विरळे यांसह विविध गावांमध्ये ५० ‘सनातन पंचांग २०२४’चे वितरण करण्यात आले. (धर्मकार्यातील एक सहभाग म्हणून ज्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांनी पंचांगांचे वितरण केले, त्याप्रकारे अन्य लोकप्रतिनिधीही अशाच प्रकारे धर्मकार्यात त्यांचा हातभार लावू शकतात ! – संपादक)