श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्याने केवळ अंतःस्थ तळमळीने प्रार्थना केल्यासही त्याला श्राद्धाचे फळ मिळणे
शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारे श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्या श्राद्धकर्त्याने निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे, ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा’, असे सांगितले आहे. केवळ असे केल्यास पितरांना श्राद्धाचे फळ कसे मिळते ? या विषयीचे शास्त्र जाणून घेऊया.