श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

हिंदुधर्मातील श्राद्धविधीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

श्राद्धविधी केल्यामुळे पुरोहित, श्राद्धकर्ते, त्यांचे कुटुंबीय आणि पूर्वज यांना लाभ झाल्याचे संशोधनाद्वारे सिद्ध !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजे ‘श्राद्ध’. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. भाद्रपदातील कृष्णपक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. पितृपक्षात पितरांचे महालय श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्राद्धविधीच्या संदर्भात करण्यात आलेले संशोधन पुढे दिले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचा त्यांच्यावर, तसेच श्राद्धविधीतील घटकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि निष्कर्ष पुढे दिले आहेत.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत ४ श्राद्धकर्ते (टीप) (आपल्या पितरांसाठी श्राद्ध करणारा तो श्राद्धकर्ता) आणि श्राद्धविधीचे पौरोहित्य करणारे २ पुरोहित सहभागी झाले होते. श्राद्धकर्ते, पुरोहित आणि श्राद्धविधीतील अन्य घटक यांची श्राद्धविधीपूर्वी अन् श्राद्धविधीनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या चाचणीत श्राद्धकर्त्याने श्राद्ध केल्याने ‘त्याचे कुटुंबीय (श्राद्ध करण्यास साहाय्य करणारी पत्नी इत्यादी) आणि पूर्वज (पूर्वजांचे छायाचित्र)’ यांवर काय परिणाम होतो ?, हेही अभ्यासण्यात आले. यासाठी ४ थ्या श्राद्धकर्त्याची पत्नी आणि त्याच्या पूर्वजांचे (दिवंगत आजोबांचे) छायाचित्र यांचीही श्राद्धविधीपूर्वी अन् श्राद्धविधीनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

टीप – चाचणीतील १ ल्या आणि २ र्‍या श्राद्धकर्त्यांना आध्यात्मिक त्रास आहे. चाचणीतील ३ र्‍या आणि ४ थ्या श्राद्धकर्त्यांना आध्यात्मिक त्रास नाही. २ र्‍या आणि ३ र्‍या श्राद्धकर्त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक आहे.

२. चाचणीतील घटकांची ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे

टीप १ – चाचणीतील श्राद्धविधीतील घटकांच्या (दर्भ, पिंड इत्यादी) निरीक्षणांचा कल (ट्रेंड) सारखाच असल्याने येथे सर्व श्राद्धकर्त्यांच्या श्राद्धविधीतील घटकांची निरीक्षणे न देता प्रातिनिधिक स्वरूपात घटकांची निरीक्षणे दिली आहेत.

टीप २ – श्राद्धविधीतील पितरांना अन्न निवेदन करणे (नैवेद्य दाखवणे)  टीप ३ – श्राद्धविधीतील देवतांना अन्न निवेदन करणे (नैवेद्य दाखवणे)

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

३ अ. श्राद्धविधीनंतर चारही श्राद्धकर्त्यांतील नकारात्मक ऊर्जा अनुमाने ५० टक्क्यांनी अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने दुपटीने वाढली.

३ अ १. विश्लेषण : श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धविधीमुळे संतुष्ट झालेले पितर श्राद्धकर्ता आणि त्याचे कुटुंबीय यांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात.

३ आ. श्राद्धविधीनंतर दर्भांमध्ये आणि पिंडांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३ आ १. विश्लेषण : श्राद्धाच्या वेळी देव आणि पितर यांना एक एक दर्भ अर्पण करून निमंत्रित केले जाते. श्राद्ध करतांना श्राद्धकर्ता दर्भावर प्रत्येक पितराच्या नावाने पिंड ठेवून त्याचे पूजन करतो. श्राद्धकर्त्याने पिंडदान (पिंडांचे पूजन) केल्याने अतृप्त पितर भुवलोकातून पिंडांकडे सहज आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते. अशा प्रकारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात. पिंडांकडे अतृप्त पितर आकृष्ट होतांना त्यांच्याभोवती असणार्‍या रज-तमात्मक वायूमंडलाचा परिणाम दर्भ आणि पिंड यांवर होतो.

३ इ. पितरांना नैवेद्य दाखवलेल्या अन्नामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आणि देवतांना नैवेद्य दाखवलेल्या अन्नामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३ इ १. विश्लेषण : पितरांना नैवेद्य दाखवलेल्या अन्नामध्ये पितरांची रज-तमात्मक स्पंदने आणि देवतांना नैवेद्य दाखवलेल्या अन्नामध्ये देवतांची चैतन्यमय स्पंदने आकृष्ट झाली.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

३ ई. श्राद्धविधीनंतर पुरोहितांमधील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

३ ई १. विश्लेषण : पुरोहितांनी श्राद्धविधी भावपूर्ण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

३ उ. श्राद्धविधीनंतर दत्ताच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

३ उ १. विश्लेषण : भगवान दत्तात्रेय हे पितर लोकाचे स्वामी आहेत. श्राद्धविधीच्या ठिकाणी श्री दत्ताचे चित्र ठेवून त्याचे भावपूर्ण पूजन केल्याने श्री दत्ताच्या चित्रातील दत्ततत्त्व (चैतन्य) जागृत होऊन कार्यरत झाले.

३ ऊ. श्राद्धविधीनंतर ४ थ्या श्राद्धकर्त्याच्या पत्नीतील नकारात्मक ऊर्जा अनुमाने ५० टक्क्यांहून अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने दुपटीने वाढली.

३ ऊ १. विश्लेषण : श्राद्धकर्त्याने श्राद्धविधी केल्याने त्याच्या कुटुंबियांनाही आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात.

३ ए. चौथ्या श्राद्धकर्त्याच्या पूर्वजाच्या (दिवंगत आजोबांच्या) छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३ ए १. विश्लेषण : पूर्वीच्या काळी छायाचित्रे नसत. त्यामुळे श्राद्धविधीच्या ठिकाणी पूर्वजांचे छायाचित्र ठेवत नसत. या प्रयोगात छायाचित्र ठेवले, म्हणजे त्यांना तेथे येण्यासाठी आवाहन केले होते. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. त्यांना गती प्राप्त होते. अशा प्रकारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात.

(विश्लेषणांचा संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)

४. निष्कर्ष

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ते, त्याचे कुटुंबीय (पत्नी इत्यादी) आणि पूर्वज या सर्वांनाच आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला. श्राद्धविधीचे पौरोहित्य भावपूर्ण केल्याने श्राद्धविधी करणारे पुरोहित यांनाही आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला. यातून हिंदु धर्मात सांगितलेल्या श्राद्धविधीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.१०.२०२१)

ई-मेल : [email protected] 

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.