हल्लीच्या काळात जवळजवळ सर्वांनाच पूर्वजांचा त्रास होत असल्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रत्येकानेच दररोज १ ते २ घंटे करणे आवश्यक आहे. पूर्वजांचा त्रास न्यून होण्यासाठी पितृपक्षात श्राद्धविधी करतात. त्यासमवेतच दत्ताचा नामजप केल्यास अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यास आणखी साहाय्य होते. यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे (१२ ते २४ माळा) आणि जास्तीतजास्त म्हणजे सतत करावा, तसेच पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दिवसभरात मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
(संदर्भ : ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)