साधकांना सूचना

१. दत्ताचा नामजप करणे
‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
जे साधक स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा होईल, असे पहावे; मात्र पूर्वजांचा त्रास जाणवल्यास त्यांनीही बसून अन् मुद्रा करून दत्ताचा नामजप करावा.
२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दिवसभरात मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा.
असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२०)
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विस्थापित हिंदु साहाय्य
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !