मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसर्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातून २०४ निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. २६ एप्रिल या दिवशी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मराठवाड्यामधील या ८ लोकसभा मतदारसंघात एकूण १६ सहस्र ५८९ मतदानकेंद्रे असतील. यामध्ये एकूण १ लाख ५२ सहस्र ३३० इतकी मतदारांची संख्या आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.