महाराष्ट्रात ९८ सहस्र ११४ मतदान केंद्रांमध्ये होणार मतदान !

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानासाठी एकूण ९८ सहस्र ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे, तर मुंबईमध्ये ७ सहस्र ३८० मतदान केंद्रे आहेत. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एकूण ९५ सहस्र ४७३ मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली होती.