दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांना बदलीची धमकी देणारा तोतया पोलिसांच्या कह्यात !

समाजाची नितीमत्ता किती खालावत चाललेली आहे, याचे उदाहरण !

दौंड – येथील पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड आणि महिला अधिवक्त्या रेश्मा चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकास दुखापत पोचवणे अन् धाकदपटशा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संदीप लगड हे नाशिक येथे लष्कराच्या तुकडीत असतांना पळून आल्याने त्यांना सेवेतून काढून टाकले होते. तरीही ते स्वतःला निवृत्त मेजर म्हणवून घेतात. त्यांनी त्रिदल सैनिक सेवा संघ नावाची संस्था काढून लोकांची फसवणूक केली. ते खासगी वाहनांवर भारतीय लष्कराच्या बोधचिन्हाचा उपयोग करत, तसेच लष्कराचे बोधचिन्ह असलेली टोपीही बाळगत होते. याविषयी सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल चंद्रशेखर रानडे यांनी केलेल्या तक्रारीअन्वये संदीप लगड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.