नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

बुलढाणा – जिल्ह्यातील चिखली शहरातील एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या मेहुण्याने बलात्कार केला आहे. या घटनेला २१ दिवस उलटूनही अद्याप आरोपी मेहुण्याला अटक करण्यात आली नसून तो पसार झाला आहे. चिखली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी ‘आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल’, असे सांगितले.
पीडित मुलगी २० ऑगस्ट या दिवशी आई-वडिलांसमवेत घरी होती. या वेळी जालना येथून तिचा मेहुणा अचानक घरी आला. जावई घरी आल्यामुळे कुटुंबाने त्याचा चांगला पाहुणचार केला. २५ ऑगस्ट या दिवशी पीडित मुलीचा वाढदिवस असल्याने ते कारण पुढे करत मेहुण्याने ‘तिला वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करून देतो’, असे सांगून बाहेर नेले. मेहुणीला शहरातील एका कपड्याच्या दुकानात नेऊन कपडे खरेदी करून दिले. त्यानंतर आरोपीने जुन्या मेहकर रस्त्यावर थांबवलेल्या एका चारचाकी वाहनात मेहुणीला बळजोरीने बसवून बलात्कार केला. ‘तुझ्या बहिणीला आणि घरच्यांना याविषयी काही सांगितले, तर तुला आणि तुझ्या बहिणीला मारून टाकेन’, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. यानंतर पीडितेने ही घटना आई, वडील आणि बहिण यांना सांगितली.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
भोर (पुणे) येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न !