सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि पुरोहित वर्ग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, तसेच बीड येथे निवेदन देण्यात आले.

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना २५ एप्रिलपर्यंत कोल्हापूर येथे पोलीस कोठडी !

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अधिवक्ता सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जन्मदिनांकाच्या नोंदीमध्ये फरक असून ‘पॅनकार्ड’ आणि शाळेचा दाखला यांच्यामध्ये जन्मदिनांक वेगवेगळा आहे. आता खोटे आणि बनावट दाखलेही शोधावे लागतील…

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पॅन कार्ड’वरील जन्मदिनांक आणि शालेय शिक्षणातील जन्मदिनांक यात तफावत का ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

ते म्हणाले, ‘‘मला जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळवण्यासाठी वाढदिवसाला श्रीरामनवमीचा आधार घेऊन दिशाभूल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच जातीयवादी आहेत.’’

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

अंगारकीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ !

कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशन, तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

काळम्मावाडी थेट पाणीवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करा ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ‘काळम्मावाडी थेट पाणीवाहिनी योजने’च्या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या. रात्रंदिवस काम चालू ठेवा; पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

कॉ. पानसरे यांची हत्या नेमकी कुणी केली ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात युक्तीवाद

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने विशाळगडावरील वाघजाईदेवीच्या मंदिर जिर्णाेद्धाराचे काम !

आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.