इस्रायल सरकार कोसळळे, ३ वर्षांत पाचव्यांदा निवडणूक घेण्याची वेळ !

इस्रायलमधील नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वात असणारे आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. परिणामी देशात गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी बनवला स्वतंत्र गट !  

भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांनी एक नवीन गट बनवला आहे. याचे नाव ‘आय२यू२’ असे ठेवण्यात आले आहे.

देशाला युद्धसज्ज करण्यासाठी सैनिकी शिक्षण अपरिहार्य !

शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात.

इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल.

रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये पुतिन यांच्याशी चर्चा करू ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची अट

रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी सिद्ध आहोत, अशी अट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी घातली आहे.

इस्रायलने भारताला लष्करी साहित्य देण्यामध्ये केलेले साहाय्य

‘जानेवारी १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी गेले. त्या वेळी राव यांनी इस्रायलला देहलीत दूतावास स्थापन करण्यासाठी होकार दिला. वर्ष १९९२ मध्ये इस्रायलचे शस्त्रास्त्रांचे कारखानदार देहलीला आले.

इराणच्या विरोधातील लढ्यात बहरीनला साहाय्य करू – इस्रायली पंतप्रधान बेनेट

‘आम्ही इराणचा सामना करण्यास सिद्ध आहोत. या प्रदेशात शांती, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी मित्र देशांना साहाय्य करण्यात येईल’, असे बेनेट यांनी सांगितले.

‘इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अमानुष अत्याचार !’ – अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीच काश्मीरमधील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांचा अहवाल प्रसिद्ध का केला नाही, हे सांगील का ?

भारत सरकारने इस्रायलकडून खरेदी केले हेरगिरी करणारे ‘पेगासस’ सॉफ्टवेअर ! – न्यूयॉर्क टाइम्सचा थयथयाट

‘भारतातील भाजप सरकारने वर्ष २०१७ मध्ये इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ. ग्रूप’कडून ‘स्पाय सॉफ्टवेअर’ (हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर) असलेले ‘पेगासस’ विकत घेतले होते. हे त्या वेळी १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारात विकत घेण्यात आले होते.

चीनला गुप्तपणे क्रूझ क्षेपणास्त्रे विकणारी इस्रायलची ३ आस्थापने दोषी !

या आस्थापनांनी अनेक ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे बनवली आणि विनाअनुमती त्यांच्या चाचण्याही केल्या. या चाचण्यांमुळे इस्रायली नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. नंतर ही क्षेपणास्त्रे गुप्तपणे चीनला पाठवण्यात आली.