चीनला गुप्तपणे क्रूझ क्षेपणास्त्रे विकणारी इस्रायलची ३ आस्थापने दोषी !

तेलअवीव (इस्रायल) – इस्रायलमधील ३ आस्थापने आणि १० जण यांना चीनला गुप्तपणे ‘क्रूझ’ (संगणकाद्वारे नियंत्रित केलेली) क्षेपणास्त्रे विकल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या आस्थापनांनी इस्रायल सरकारच्या अनुमतीविना ही क्षेपणास्त्रे चीनला विकली होती.

सरकारी अधिवक्त्यांनी सांगितले की, या आस्थापनांनी अनेक ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे बनवली आणि विनाअनुमती त्यांच्या चाचण्याही केल्या. या चाचण्यांमुळे इस्रायली नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. नंतर ही क्षेपणास्त्रे गुप्तपणे चीनला पाठवण्यात आली. याच्या बदल्यात या आस्थापनांना कोट्यवधी रुपये मिळाले.