Goa Bogus Passport Scam : जन्मदाखल्यातील माहिती चोरून बनावट पारपत्र बनवण्याचा घोटाळा उघडकीस

दलाल आणि सरकारी कर्मचारी यांच्या संगनमताने गोमंतकियांच्या जन्मदाखल्यातील माहिती चोरून त्या माहितीच्या आधारे बनावट पारपत्र सिद्ध केले जाते. हा घोटाळा पूर्वीपासून चालू असून अनेक गोमंतकियांना आतापर्यंत फटका बसला आहे.

Erdogan Israel : (म्हणे) ‘युद्धानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर खटला प्रविष्ट करा !’ – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

तुर्कीये आणि तिचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘काश्मीरवर मुसलमानांचाच अधिकार आहे’, असे सांगून तेथे चालू असलेल्या जिहादी आतंकवादी कारवायांचे समर्थन केले जाते. त्यामुळे एर्दोगन यांनी हमासला पाठिंबा दिल्यास काय आश्‍चर्य ?

जपानमध्ये मुलांच्या विचित्र नावांच्या विरोधात सरकार करणार कायदा !

अध्यात्मशास्त्रानुसार शब्द,स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असते. त्यामुळे मुलांची सात्त्विक आणि देवांची नावे ठेवल्यास मुलांना त्याचा लाभ होतो.

युक्रेन युद्धात रशियाकडून लढणार्‍यांपैकी ६ गोरखा सैनिकांचा मृत्यू

मृतदेह रशियातच पुरले !

America Doctors : अमेरिकेत कामाचे वाढते तास आणि ‘टार्गेट’ यांमुळे डॉक्टर अत्यंत त्रस्त !

कारखाना कर्मचार्‍यासारखी दिली जाते वागणूक !

इस्रायल हमासच्या बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे सहस्रो घनमीटर पाणी सोडणार !

आतापर्यंत गाझामध्ये १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात अनुमाने हमासचे ५ सहस्र आतंकवादी आहेत.

पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी लखबीर रोडे याचा मृत्यू

‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा होता प्रमुख, तर जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा पुतण्या

Police Stabbed : एका कैद्याने कृष्णवर्णियाची हत्या करणार्‍या पोलिसाला कारागृहात २२ वेळा भोसकले !

अ‍ॅरिझोना येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन !

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्‍या रशियन महिलांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १३ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

Houthi Israel : हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात इस्रायली नौकांवर डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.