युक्रेन युद्धात रशियाकडून लढणार्‍यांपैकी ६ गोरखा सैनिकांचा मृत्यू

मृतदेह रशियातच पुरले !

काठमांडू (नेपाळ) – रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या नेपाळमधील गोरखा सैनिकांपैकी ६ सैनिकांचा युक्रेन युद्धात लढतांना मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहांना रशियात पुरण्यात आल्याची माहिती नेपाळ सरकारने दिली आहे. या सैनिकांचे मृतदेह परत मिळण्यासाठी नेपाळ सरकार प्रयत्न करत आहे. सध्या रशियाच्या सैन्यात २०० गोरखा सैनिक भरती झाले आहेत. नेपाळच्या सरकारने गोरखा तरुणांना रशियाच्या सैन्यात भरती होण्याची अनुमती दिलेली नसली, तरी हे तरुण बेकायदेशीर मार्गाने रशियामध्ये पोचून तेथील सैन्यात भरती होत आहेत.

संपादकीय भूमिका

नेपाळच्या हिंदु गोरख्यांनी रशियाच्या सैन्यामध्ये भरती होऊन स्वतःच्या प्राणांचे बलीदान देणे, ही नेपाळ आणि भारत यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही. त्यांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारने प्रयत्न करायला हवेत !