Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे – २ हिंदु नगरसेवकांची हत्‍या

बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्‍ये प्रतिकार करण्‍याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्‍य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्‍यांच्‍याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !

बांगलादेशामधील हिंसाचारात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्‍यू

आरक्षणाच्‍या सूत्रावरून बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा हिंसाचार चालू झाला आहे. ४ ऑगस्‍टला झालेल्‍या हिंसाचारात ९१ जणांचा मृत्‍यू झाला. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. यात १४ पोलिसांचाही समावेश आहे.

कल्याण येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी !

संपूर्ण देशभरात प्रतिदिन मंदिरांमध्ये चोर्‍या होत असल्याची वृत्ते समोर येत असतात त्या रोखण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारे गांभीर्याने पहात आहेत आणि उपाययोजना काढत आहेत, असे कुठेच दिसून येत नाही

Bareilly Temple Vandalized : बरेली (उत्तरप्रदेश) येथे मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड करणारे शाहरुख, अर्शद आणि अक्रम यांना अटक !

अक्रम याला जमावाने चोप देऊन पोलिसांच्‍या कह्यात दिले.

Canada Temple Attack : कॅनडामध्‍ये पुन्‍हा एकदा खलिस्‍तान्‍यांकडून हिंदूंच्‍या मंदिराची तोडफोड !

जिहादी आतंकवादी जे परदेशात करत नाहीत, ते खलिस्‍तानी करत आहेत. अशांचे नाक दाबण्‍यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

Hubballi Priest Stabbed : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्‍याची हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्‍याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्‍यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत विठ्ठलाचा मुकुट चोरणार्‍याला अटक आणि सुटका !

येथील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरील मुकुटाची चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रकाश शर्मा (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.

Ghazipur Temple Theft : उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील श्री दुर्गादेवीच्या २ मंदिरांमध्ये चोर्‍या !

गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्‍या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.

JK High Court : गांदरबल (काश्मीर) येथील काश्मिरी हिंदूंच्या दुर्लक्षित मंदिरांचे संरक्षण करा !

‘काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंसह हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर आक्रमण केल्याने आणि त्यामुळे हिंदूंना स्वतःच्याच भूमीतून विस्थापित व्हावे लागल्याने ही मंदिरे दुर्लक्षित राहिली’, हे वास्तवही समाजासमोर मांडणे आवश्यक आहे !

श्री केदारलिंग देवस्थान येथील श्री यमाईदेवी मंदिरात चोरी !

गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !