गोवा : मद्यालयांच्या बाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करणार !

पोलीस असे किती दिवस मद्यालयांच्या बाहेर उभे रहाणार ? त्यापेक्षा लोकांनी मद्यपान करू नये, यासाठी समाजाला साधना शिकवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांची पुढाकार घ्यायला हवा !

शोकसभेत नीलिमाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय !

ओमळी येथील नीलिमा चव्हाण या प्रथम बेपत्ता आणि नंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या शोकसभेचा संक्षिप्त वृत्तांत . . .

अन्वेषणात प्रथमदर्शनी घातपात झाल्याविषयी माहिती नाही ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी

नीलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण ! हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे, अशी  माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची राज्‍यशासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्‍ट या दिवशी विधानसभेत केली. 

अमानुष लाठीमाराची चौकशी करून कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुळात हिंदुत्वनिष्ठांनी कोणतीही हुज्जत घातली नाही ना कुठला अनुचित प्रकार केला ! तरीही पोलिसांच्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच येथे आलेल्या नगराध्यक्षांची कॉलरही पोलिसांनी पकडली.

गोवा : पिर्ण येथील ३ मंदिरांमध्ये चोर्‍या

गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच ! हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !

रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !

रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.

सिंधुदुर्ग : तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना ! 

कोल्हापूरमधील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या कामात कोट्यवधीचा घोटाळा करणारे अधिकारी निवृत्त !

या प्रकरणी दूधगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले जाईल, तसेच जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे एका मासाच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.