सिंधुदुर्ग : तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिरात चोरी !

एका मासातील चौथी घटना !

तांबळेश्‍वर येथील श्री देवी भगवती

वेंगुर्ला – तालुक्यातील मंदिरांमधील दानपेटी फोडणे किंवा साहित्य चोरणे या प्रकारांत वाढ होत आहे. २७ जुलै या दिवशी मध्यरात्री तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिराचा दरवाजा फोडून अज्ञातांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. २८ जुलै या दिवशी सकाळी नितीन कुबल पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा फोडलेल्या स्थितीत आढळला. मंदिरातील काही साहित्याची चोरी करण्यात आली आहे.

चोरट्यांनी दरवाजा फोडून केली चोरी !

या घटनेच्या आधी तालुक्यातील मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिर, सागरेश्‍वर येथील मंदिर, वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ३ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना !