३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.

भविष्यात उच्चशिक्षण मातृभाषेत दिले जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

भविष्यात उच्चशिक्षणही मातृभाषेत दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. 

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी  ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.

छगन भुजबळ यांच्याकडून मुंबईचा ‘कोंबडी’ असा उल्लेख !

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई ही सोन्याची अंडे देणारी ‘कोंबडी’ आहे. ती कापून खायची का ? त्यावर भाजपच्या सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत हरकतीचे सूत्र उपस्थित केले.

विधीमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली’ हे ‘अ‍ॅप’ उपलब्ध !

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अ‍ॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अ‍ॅप’चा वापर करावा.

मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज २ वेळा स्थगित

सभागृहात एकूणच गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा प्रत्येकी १५ मिनिटांसाठी स्थगित केले.

पिंपळेगुरव (पुणे) येथील रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी अभियंत्यासह चौघांच्या विभागीय चौकशीचे आदेश !

पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे होत असतांना नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा ठपका ठेवत स्थापत्य विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंताची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत.

मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक संघटितपणे लढा देणार !

सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या करमणुकीसाठी डिजिटल थिएटर उभारले !

अधिवेशाचा वेळ बहुमूल्य आहे. सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर आणि जनतेचे सहस्रो प्रश्न प्रलंबित असतांना एकत्रित बसून समोरासमोर चर्चा करून सोडवण्याऐवजी अधिवेशनातील वेळ मनोरंजनासाठी देणे, हे संतापजनक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणार्‍या अधिवेशनाच्या कालावधीत असा विचार करणारे…