मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज २ वेळा स्थगित

अंबादास दानवे

नागपूर – ‘एन्.आय.टी.’चा ८३ कोटी रुपयांचा भूखंड दीड कोटी रुपयांना दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. या वेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दानवे यांच्या विधानावर हरकत घेतली. त्यावर पुन्हा विरोधकांनी आक्षेप घेतला.

यानंतर विरोधकांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले असता, विरोधकांनी त्यावर हरकत घेत सभापतींच्या आसनामोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करत गदारोळ केला. या गदारोळातच उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत राहिले. सभागृहात एकूणच गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा प्रत्येकी १५ मिनिटांसाठी स्थगित केले.