कर्नाटकातील कलबुर्गी येथे ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या रुग्ण महिलेची रुग्णालयात भरती होण्यासाठी वणवण !

आज ऑक्सिजनसाठी वणवण करणार्‍या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्‍चर्य वाटू नये !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुसलमानाकडे हिंदूचा, तर हिंदूकडे मुसलमानाचा मृतदेह ! मुसलमानांकडून पुरण्यात आलेला हिंदूचा मृतदेह काढून अग्नीसंस्कार !

कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी निधीची कमतरता असल्याने मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील शवागार भरले

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यास निधीची अडचण निर्माण झाल्याचे २० एप्रिलला वृत्त होते. यामुळे हे बेवारस मृतदेह हॉस्पिसियो रुग्णालयाच्या शवागारात ठेवणे भाग पडले होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील नियमित शस्त्रकर्मे थांबवली !

कोरोना वाढत असतांना शस्त्रकर्म केल्यास त्या रुग्णालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित शस्त्रकर्मे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.

मी देशासाठी लढतो; मात्र माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीत ! – सैनिकाची खंत

सीमा सुरक्षा दलातील एका सैनिकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित सैनिक प्रयत्न करत आहे; मात्र एकाही रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याने त्याला बराच त्रास सहन करावा लागला.

चोख आणि प्रामाणिक काम हवे !

खासगी रुग्णालयांवर चाप बसवायलाच हवा. तिथे कुठल्याच शासकीय घटकाने भ्रष्टाचाराच्या स्वार्थांधतेला बळी पडून समाजद्रोह करायला नको. चोख आणि प्रामाणिक काम कोरोनाच्या साखळीला नक्कीच आटोक्यात आणील, यात शंका नाही !

केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार्‍या १०० रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कणकवली रेल्वेस्थानकावरील रॅपिड टेस्ट किटचा साठा संपला !

कोविड रुग्‍णालयांसाठी ५ सहस्र ९०० रेमडेसिविर इंजेक्‍शनचा साठा उपलब्‍ध !

रेमडेसिविर इंजेक्‍शनसाठी धावाधाव करणार्‍या रुग्‍णांचे नातेवाइक आणि रुग्‍णालय यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रुग्‍णालयामध्‍ये मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णाच्‍या नातेवाइकांची रुग्‍णालयात तोडफोड आणि  कर्मचार्‍यांना मारहाण !

आपत्‍कालीन परिस्‍थितीत कसे वागावे, याचे भान नसणारे असे नागरिक अराजक निर्माण करणार. अशांवर कठोर कारवाई केल्‍यासच इतरांवर जरब बसेल !