आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, याचे भान नसणारे असे नागरिक अराजक निर्माण करणार. अशांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल !
पुणे (देहूरोड) – रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयामध्ये हाणामारी केली. तेथील ‘वॉर्डबॉय’, सफाई कर्मचारी आणि रखवालदार यांना मारहाण केली. ही घटना १९ एप्रिलला देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये घडली. सूरज कटारे, नागेश अवघडे, सूरज डेव्हिड, बंटी कटारिया यांच्यासह २५ ते ३० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. श्रीनिवास चाटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली आहे. रुग्णालयाच्या खोलीची तोडफोड करून डॉक्टर करीत असलेल्या शासकीय कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला, असे तक्रारीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !