आज ऑक्सिजनसाठी वणवण करणार्या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !
कलबुर्गी (कर्नाटक) – जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये खाटांची अनुपलब्धता असल्याने रुग्णांना विविध रुग्णालयांमध्ये फिरून ‘खाट उपलब्ध आहे का ?’ यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील बसवनगरमध्ये एका ५५ वर्षांच्या महिलेला खोकला, तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नातेवाईक तिला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले; मात्र तेथे अतीदक्षता विभागात खाट उपलब्ध नसल्याचे सांगून तिला बाहेरच ऑक्सिजन सिलिंडर लावून कत्रिम श्वासनाची व्यवस्था केली.
या महिलेला अतीदक्षता विभागात भरती करण्यासाठी ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत ४ रुग्णालयांमध्ये फिरवण्यात आले; मात्र तिची कुठेही व्यवस्था झाली नाही. ३ घंट्यांनंतर येथील जिम्स रुग्णालयात अतीदक्षता विभागात खाट उपलब्ध असल्याने तेथे तिला भरती करण्यात आले.