ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणार्‍या व्यक्तीला कानाखाली लगावण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे उद्दाम उत्तर !

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्‍वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी नवीन रुग्णांना रुग्णालयात प्रवेश बंद !

सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे.

शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

सुरक्षितता आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याविषयी त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे, तसेच दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र शहरामध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे, तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

दीड लाख रुपये देऊन रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये खाट उपलब्ध !

रुग्णांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्‍या रुग्णालय प्रशासनाला याविषयी खडसवायला हवे !

वीज गेल्याने अतीदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका

व्हेन्टिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

रेमडेसिविर, ऑक्सिजन, एच्.आर्.सी.टी. टेस्ट यांविषयी संभ्रम दूर होणे आवश्यक ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

रेमडेसिविर औषधाचा दुष्परिणाम हायपरसेंसेटीव्हीटी, किडनीवर ताण येणे, यकृताला सूज येणे अशा गोष्टी १० दिवसांत आढळू शकतात.

महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मधील ५० प्रतिशतहून अधिक खाटा रिकाम्या !

महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटर मधील ५० प्रतिशतहून अधिक खाटा मात्र रिकाम्या आहेत.

नगर जिल्ह्यातील ऑक्सिजननिर्मिती करणार्‍या आस्थापनांनी यापुढे केवळ जिल्ह्यात मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्याचे आदेश !

नगरमधील अनेक खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा संपला.

सांगली महापालिकेचे १२० खाटांचे कोरोना रुग्णालय २४ एप्रिलपासून चालू होणार ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

या रुग्णालयात ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशाच रुग्णांना भरती करून घेतले जाणार आहे.