कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…

पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा प्रश्‍न

हेल्पलाईनवरून खाटा मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जात असले, तरी त्याच वेळी सर्व खासगी रुग्णालये आणि सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती होते. गंभीर रुग्णाला अत्यावश्यक व्हेंटिलेटर सज्ज खाटा थेट रुग्णालयांकडून भरल्या जातात. त्यामुळे या जागा हेल्पलाईन वर उपलब्ध होत नाहीत असे दिसले.

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद !

लसीच्या मर्यादित साठ्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान !

भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून ३ मे या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.

काशिळ (जिल्हा सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयात चालू होणार कोविड रुग्णालय !

कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलेले असतांना काशिळ येथील ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर कोविड रुग्णालय चालू होते. तर अगोदरच त्यांची आवश्यकता ओळखून प्रशासनाने रुग्णालय का चालू केले नाही ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याचे दिले आश्‍वासन

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस !

सकाळी मृत घोषित केलेल्या रुग्णाला कुटुंबीय न्यायला आले असता तो जिवंत असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे उघड !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

एका जिल्ह्यातील एका रुग्णालयातील कोरोनाबाधिताला रेमडेसिविर इंजेक्शन मिळवतांना आलेला कटू अनुभव !

धुळे येथे कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचे पैसे आणि दागिने रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी चोरले !

रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्‍वास उडाला तर आश्‍चर्य वाटायला नको !