आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान !

महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस (डावीकडे) यांना रुग्णवाहिका प्रदान करतांना आमदार सुधीर गाडगीळ (उजवीकडे)

सांगली – भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून ३ मे या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे रुग्णवाहिकेची किल्ली सुपूर्द केली. सदरची रुग्णवाहिका कुपवाड विभागाला देण्यात आली आहे.

महापालिकेस देण्यात आलेली रुग्णवाहिका

या वेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन माझ्या स्थानिक विकासनिधीतून २ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. यातील १ कुपवाडसाठी देण्यात आली असून दुसरी शासकीय रुग्णालयास लवकरच देण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, संजय कुलकर्णी, गजानन मगदूम यांसह अन्य उपस्थित होते.