यवतमाळ जिल्‍ह्यात सामूहिक शस्‍त्रपूजन पार पडले !

विजयादशमीच्‍या निमित्ताने युवकांमध्‍ये शौर्य जागृतीसाठी दसर्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ठिकठिकाणी सामूहिक शस्‍त्रपूजनाचे आयोजन करण्‍यात आले होते.

पावस (रत्नागिरी) येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विजयादशमीच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होण्याकरता सामूहिक शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुसलमान तरुणींना हिजाब घालून नोकर भरतीच्या परीक्षेला बसू देण्याचा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय !

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात निर्णय दिलेला असतांना न्यायालयाचा अवमान करणारा अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकार घेते, हे लक्षात घ्या !

पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे येथे १५ ऑक्‍टोबरपासून ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानास प्रारंभ झाला आहे. विविध ठिकाणी ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर व्‍याख्‍यानांचे आयोजन करण्‍यात आले होते.

देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही !

हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर.

जाणीवपूर्वक द्वेष पसरवणारे वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

कराड येथील अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे उपस्थित होते.

श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील श्रीराम मंदिरात सुनील घनवट यांनी घेतले दर्शन !

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील ओझर येथे होणार्‍या परिषदेचे निमंत्रण दिले, तसेच समितीच्या वतीने मंदिर रक्षणाविषयी राबवण्यात आलेल्या विविध अभियानांचीही माहिती दिली.

सनातन धर्म सोडून जगणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगात मागील ३ पिढ्यांनी धर्माचरण, धर्म-संस्कृतीचे पालन केले नाही. त्यामुळे आज हिंदु धर्म आणि हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. त्यांना कुणीही वाली उरलेला नाही.

सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ‘हेट स्पीच’ प्रकरणी तक्रार प्रविष्ट !

‘हेट स्पीच’ प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी तक्रार मिरज, विटा, ईश्वरपूर, पलूस, तासगाव येथील पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करण्यात आली.

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ची भोर, हडपसर आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर (पुणे) येथील दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली !

नवरात्रोत्सव काळात प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर या दिवशी या दौडची सांगता झाली.