सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत सांगली जिल्ह्यातील विविध शहरांत सनातन धर्मीयांमध्ये जागृती करणारी व्याख्याने आणि बैठका घेण्यात आल्या. त्याविषयीचा वृत्तांत देत आहोत.
दानोळी (जिल्हा कोल्हापूर) – पुणे जिल्ह्यातील राहुरी येथील मुसलमान शिक्षिकेने शिकवणीच्या नावाखाली अनेक हिंदु तरुणींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवले. विधान परिषदेतील भाजपचे आमदार श्री. प्रसाद लाड यांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवल्यानंतर संबंधित मुसलमान शिक्षिका आणि तिचे अन्य साथीदार यांना अटक करण्यात आली. अशा प्रकारची सहस्रो प्रकरणे प्रतिदिन उघडकीस येत आहेत. तरी या संदर्भात युवतींनी जागृत होणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.
१८ ऑक्टोबर या दिवशी येथील श्री बिरोबा मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या सर्वांनी ‘दानोळी आणि जवळपासच्या गावांत बैठका घेऊन या अभियानात सहभागी होऊ’, असे सांगितले.
१. पलूस – पलूस येथील श्री मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी सर्वांनी त्वरित कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
२. विटा – येथे व्याख्याते आणि राष्ट्रधर्म अभ्यासक श्री. अभय भंडारी, सिंहसेना संस्थापक शिवभैय्या शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विजय नागमल, विशाल जाधव, धर्मप्रेमी सर्वश्री दत्तात्रय गायकवाड, अरुण होलमुखे, नरेंद्र महाराज संप्रदायाचे अधिवक्ता बापूसोा पाटील, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रशांत सुतार, भगवान विष्णु ढमाले, विजय चव्हाण, ईश्वरभाई पटेल, ‘श्रीमान हिंदवी प्रतिष्ठान’चे श्री. विश्वास कोडूलकर, श्री. रणजित मोहिते उपस्थित होते.
विटा येथे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘श्री राजलक्ष्मी ग्रुप’चे डॉ. शंकरशेठ बुधवानी यांच्याशी वैयक्तिक संपर्क झाला. ‘हलाल जिहाद’ संकल्पना आणि त्याविषयीच्या लढ्याचे स्वरूप त्यांनी जाणून घेतले. ‘पुष्कळ उद्बोधक माहिती अगदी नेमकेपणे मिळाली’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी डॉ. बुधवानी यांनी कौतुक करून सनातन संस्थेच्या आश्रम भेटीसाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारले. या वेळी त्यांनी श्री. रमेश शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
तासगाव – येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अधिवक्ता धैर्यशील उपाख्य संतोष पाटील येळावी, उद्योजक श्री. प्रदीप शहा, ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे श्री. अथर्व जोशी यांसह ९० धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
विशेष – कार्यक्रम स्थळापासून १५ किलोमीटर अंतरावरील सावर्डे गावातून दिव्यांग (अपंग) असणारे श्री. संदीप नानासाहेब माने हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री नृसिंह सरस्वती दत्त देव संस्थानला मंदिर महासंघ परिषदेचे निमंत्रण !
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – पुणे येथील ओझर गणेश मंदिर येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी मंदिर महासंघ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचा उद्देश यशस्वी होण्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष श्री. संतोष खोंबारे पुजारी यांसह पदाधिकार्यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भेट घेऊन त्यांना परिषदेचे निमंत्रण दिले. ‘मंदिर सरकारीकरण, पुरोहितांचे अपुरे मानधन, मंदिर व्यवस्थापनातील शासकीय हस्तक्षेप, मंदिरांच्या निधीचा शासन आणि प्रशासन यांनी केलेला अपवापर, अशा सर्व प्रश्नांच्या संदर्भात संघटित होऊन प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ या परिषदेच्या माध्यमातून कटीबद्ध असेल, असे श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी सांगितले. या वेळी श्री. सदाशिव जेरे पुजारी आणि श्री. विवेक हावळे पुजारी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री द्वारकाधीश मुंदडा, गिरीश पुजारी आणि संतोष देसाई उपस्थित होते.