Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभक्षेत्री उपाहारगृहांतून उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांची सर्रास विक्री !
भाविकांचे आरोग्य धोक्यात, तर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
भाविकांचे आरोग्य धोक्यात, तर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याची चेतावणी देणारा संदेश छापण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. पुण्यातील यश चिलवार या युवकाने या संदर्भात याचिकेद्वारे मागणी केली होती.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथे रहाणार्या मंगला चव्हाण या ५६ वर्षीय महिलेचा ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ने मृत्यू झाला आहे. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णसंख्येत वाढ चालू झाल्यापासून राज्यातील हा २ रा मृत्यू आहे.
पुण्यात वाढ होणार्या या विषाणूच्या रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेज्यूनी’ हा जिवाणू महत्त्वाचे कारण ठरत आहे. दूषित आणि अल्प शिजवलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा दूषित पाणी यामुळे संसर्ग होत आहे.
या वेळी श्री. केसरी यांनी राज्यमंत्री संजीव कुमार गोंड यांना समितीचे माहितीपत्रक देऊन समितीच्या राष्ट्र आणि धर्मविषयक कार्याशी अवगत केले.
महाकुंभपर्वात येणार्या कोट्यवधी भाविकांना आजारावर उपचार मिळावेत, यासाठी १० आयुर्वेद चिकित्सालय उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चिकित्सालयात ३ वैद्यांसह अन्य ६ कर्मचारी कार्यरत आहेत. एका चिकित्सायलयात प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत.
‘फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी दधीच यांची माहिती
गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जी.बी.एस्.) रुग्णांची पुण्यातील एकूण संख्या ७० वर पोचली आहे. त्यांतील १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात अन्यत्रही जी.बी.एस्.चे ३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणे, हे प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचे द्योतक नव्हे का ?