‘एम्स्’च्या (देहली) आधुनिक वैद्यांचा सल्ला !
पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारापासून वाचण्यासाठी बाहेरचे अन्न खाणे आणि पाणी पिणे टाळावे. भात, चीज आणि पनीर या गोष्टींचा आहारात समावेश करणे टाळावे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील, याची काळजी घ्यावी. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खावीत आणि ‘सी’ जीवनसत्त्वाचे सेवन करावे. २ आठवड्यांच्या उपचाराने हा आजार बरा होतो, अशी माहिती ‘एम्स्’ देहली मेडिसिन (औषध) विभागप्रमुख डॉ. प्रियांका सेहरावत यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओद्वारे दिली.
View this post on Instagram
पुण्यात वाढ होणार्या या विषाणूच्या रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेज्यूनी’ हा जिवाणू महत्त्वाचे कारण ठरत आहे. दूषित आणि अल्प शिजवलेले मांस, पाश्चर (दुग्धजन्य पदार्थांतील जंतू नष्ट करण्यात येणारी प्रक्रिया) न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा दूषित पाणी यामुळे संसर्ग होत आहे.