रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

बेळगाव येथे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मराठी भाषेचे स्टेटस ठेवणार्‍या ४ तरुणांना कर्नाटक पोलिसांकडून अमानुष मारहाण

कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्‍न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला.

सचिन वाझे यांची अटक अवैध असल्याची त्यांच्या भावाची न्यायालयात याचिका

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती

वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मार्चच्या रात्री त्यांना अटक केली. वाझे २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत आहेत.

बेंगळुरू येथील १६ मशिदींना ध्वनीप्रदूषणावरून कर्नाटक उच्च न्यायालयाची नोटीस !

मुळात यासंदर्भात जनतेला न्यायालयात जावे लागू नये ! पोलीस आणि प्रशासन बहिरे आहेत का ? जनतेला जे लक्षात येते ते यांच्या लक्षात का येत नाही ? कि ते मशिदींमळे शेपूट घालतात ?

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून अटक

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ वाहन उभे करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एन्.आय.ए.ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अन्वेषणाची दिशा आणि दशा !

मुंबईत स्फोटके सापडणे आणि यामध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू होणे, या प्रकरणी खरेतर महत्त्वाच्या अन्वेषण यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून गतीने अन्वेषण पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र घडले उलटेच.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे ‘शंकर पार्वती बीडी’ या नावाने उत्पादनाची विक्री !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्‍या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !

परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांकडून प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !