शिवराज नारियलवाले यांच्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस महानिरीक्षक

९ एप्रिल २०२१ या दिवशी येथील पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना काठी तुटेपर्यंत अमानुष मारहाण केली होती.

जालना येथील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलीस अधिकार्‍यांकडून काठी तुटेपर्यंत मारहाण ! 

मारहाण करणारे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षकच आहेत ! अशा प्रकारे जनतेवर दादागिरी करणार्‍या पोलिसांना सरकारने तात्काळ बडतर्फ केले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलीस मित्राचा अत्याचार

या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संशयीत आरोपी रवी मल्लीकार्जुन भालेकर यास पोलीस सेवेतून निलंबित केले आहे.

हुंड्यासाठी छळ करणार्‍या बाहेरख्याली पोलीस पतीला पत्नीने जाळ्यात अडकवून रंगेहाथ पकडले !

गुप्तचर शाखेचा अधिकारी सत्यम बहल याला त्याच्या पत्नीने सापळा रचून अन्य महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे पतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

नवघर पोलीस ठाण्यात हवालदाराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !

नागपूर येथे पोलीस अधिकार्‍याने वृद्ध महिलेचा भाजीपाला रस्त्यावर फेकला !

शहरातील जरीपटका भागात पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी रस्त्याशेजारी भाजीची विक्री करणार्‍या एका वृद्ध गरीब महिलेचा भाजीपाला भर रस्त्यात फेकून दिला. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत.

४ अंड्यांची चोरी करणारा पोलीस हवालदार निलंबित !

स्वतः चोरी करणारे पोलीस समाजात होणार्‍या चोर्‍या आणि लूट कशी रोखणार ?

विधवा महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला रंगेहाथ अटक  

रक्षक नव्हे, भक्षक झालेल्या अशा पोलिसांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे बडतर्फ !

प्रसिद्धी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या जवळ स्फोटकासाठी वापलेल्या जाणार्‍या जिलेटीनच्या कांड्या आढळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मुंबई पोलीस दलाने बडतर्फीची कारवाई केली आहे.

स्थानांतर केल्यामुळेच परमबीर सिंह यांचे खोटेनाटे आरोप ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या..