स्वतः चोरी करणारे पोलीस समाजात होणार्या चोर्या आणि लूट कशी रोखणार ?
चंडीगड – पंजाबमध्ये एका पोलीस हवालदाराने अंडी चोरल्यामुळे त्याला नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. या चोरीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
हा पोलीस रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करत असतांना छिंदर नावाचा एक अंडी विक्रेता त्याची दुचाकी घेऊन रस्त्यावर थांबला. बाजूच्या एका दुकानात अंड्यांची ऑर्डर देण्यासाठी त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्याच्या दुचाकीवर शेकडो अंडी ठेवण्यात आली होती. यावेळी तेथे अन्य कुणी नव्हते, हे पाहून या पोलिसाने वाहतूक सांभाळण्याचे नाटक करत दुचाकीवरील अंडी चोरली. त्याने ४ अंडी त्यांच्या खिशात टाकली. ट्रेमधून अंडी चोरतांनाचा हा प्रकार बाजूला उभा असलेल्या एका माणसाने भ्रमणभाषवरील कॅमेर्यातून चित्रीत केला.
Video | चार अंड्यांची चोरी महागात, पोलीस हवालदार थेट निलंबित, चोरीचा व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/fdJYXFo4ZI#viral | #ViralVideo | #PoliceConstabble | #PanjabPolice |
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2021
त्यानंतर हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर त्याची माहिती पोलीस अधीक्षक अमनित कौंडल यांच्यापर्यंत पोचली. त्याची नोंद घेत त्यांनी या पोलिसाला निलंबित केले. तसेच या प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचा आदेशही दिला.