असे पोलीस हवालदार पोलीस खात्यात असणे पोलीस खात्याला कलंकच !

ठाणे – भाईंदर पूर्वे येथील नवघर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रेमसागर वाघ (वय ५१ वर्षे) यांच्या विरोधात महिला पोलीस शिपाईच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी वाघ हे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हवालदार वाघ आणि पीडित महिला पोलीस शिपाई हे दोघेही विवाहित आहेत. त्यांचे ३ ते ४ वर्षांपासून असलेले संबंध पोलीस वर्तुळात चर्चेत होते. दोघेही नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पीडितेचे जानेवारीमध्ये अन्यत्र स्थानांतर झाले होते. वाघ यांनी वर्ष २०१९ पासून अपलाभ घेत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अमर मराठे यांनी तक्रार घेत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पुढील अन्वेषण नयानगर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी पाटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !