कुकर्म्यांना शिक्षा का करायची ? हेही ज्ञान नसलेले कलियुगातील शासनकर्ते !

‘शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, ‘‘हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये).

विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’

आनंदमात्र स्थिती हीच आत्मस्थिती !

‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.

संतभूमीतील अमूल्य संतरत्न : पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी १२ मार्च या दिवशी देहत्याग केला. २१ मार्च या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच सनातनचे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल.

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.