‘शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, ‘‘हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण (चांगुलपणाने होणारी कृत्ये), रजोगुण (वासनांच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये) आणि तमोगुण (अज्ञानामुळे होणारी कृत्ये). त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात. चांगले-वाईट यांतील भेद (फरक) कळत असूनही जे मुद्दाम वाईट वागतात, त्यांना मात्र कठोर यातना भोगाव्या लागतात.’