दुष्कर्मी लोकांची मानसिकता !
दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात. – प.प. भगवान श्रीधरस्वामी
दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात. – प.प. भगवान श्रीधरस्वामी
२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.
स्वानुभवानेच अनुभवता येणार्या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या.
या सुकणार्या, नश्वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?
आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !
जगामध्ये पूर्वीपासूनच सत्य आणि असत्य यांची झुंज चालू आहे. खोटा आणि खरा असा वाद चालू आहे. खोटी नीती आणि खरी नीती, असेही चालू आहे; परंतु ईश्वर सत्याच्या बाजूला उभा असतो….
आपल्या वागण्याचे कोणते परिणाम होतील, यावर दूरदृष्टी ठेवून आपण आपले प्रत्येक कार्य केले पाहिजे. त्यासाठी एखादी गोष्ट स्वतःला समजली नाही, तर ती आपण दुसर्यांना विचारून समजून घेऊन करावी.
‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’