बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.

साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. ताई साधकांच्या मनावर बिंबवतात, ‘‘आपण गुरुसेवक आहोत. सेवकाने केवळ गुरुसेवाच करायची असते.’’ त्यामुळे माझ्यातील अहं न्यून होऊन माझ्यात सेवकभाव दृढ झाला. ताईंनी स्वतःच्या कृतीतून मला ‘कितीही त्रास होवो. गुरुचरणांची सेवा कधीच सोडायची नाही, सवलत घ्यायची नाही’, हे शिकवले.’

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) !

‘पू. ताईंनी ‘साधकांचे कौतुक करणे, साधकांच्या गुणांविषयी बोलणे, साधक परिस्थितीवर मात करून सेवा चांगली कशी करतात ?’, याविषयी सांगणे’, यांमुळे सर्वांच्या मनात प्रेम निर्माण होते.

लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !

माघ शुक्ल एकादशी (२०.२.२०२४) या दिवशी पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

पू. दाभोलकरकाका सदा सर्वदा नामस्मरणात रंगती ।

त्यांच्या आठवणीने किंवा आश्रमात येता-जाता मिळणार्‍या सहवासाने त्यांच्याकडून सूक्ष्मातील चैतन्य मिळते. परिणामी माझ्यातील अहंपणा गळून जातो, तसेच माझ्यावरील रज-तमाचे आवरण अल्प होऊन आनंद मिळतो.

कुटुंबियांचा आधारस्तंभ आणि सतत कृतज्ञताभावात असणारे पू. (कै.) चंद्रसेन मयेकर !

ते नेहमी म्हणत, ‘‘माझे गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या पाठीशी असल्याने मला कशाचीही काळजी नाही.’’ त्यांनी साधकांच्या मनावरही गुरूंप्रती दृढ श्रद्धा बिंबवली होती. त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुरुआज्ञेचे पालन केले.

१४ फेब्रुवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’ !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनांवर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

प.पू. कलावतीआई यांच्या बोधामृतातील खोटे वैराग्य व खरे वैराग्य या विषयी पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक) यांनी केलेले सविस्तर विवेचन या लेखात वाचकांसाठी देत आहोत.