सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात कचरा टाकणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीवर आली क्षमा मागण्याची वेळ !

ज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ?

गोवा : सरकारने कांपाल येथील ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ची निविदा मागे घेतली

कांपालवासियांचा या ‘पार्क’ला विरोध असल्याने सरकारने हा प्रकल्प तेथे न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प अन्य ठिकाणी नेण्यात येणार असून नवीन जागेची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

गोवा : डेक बेड आणि कचरा विल्हेवाट शुल्कात पर्यटन खात्याकडून कपात

राज्य पर्यटन खात्याने आज एका सार्वजनिक सूचनेद्वारे शॅक व्यावसायिकांना दिलासा देणारी घोषणा केली. डेक बेड आणि कचरा विल्हेवाट यांच्या शुल्कात पर्यटन खात्याकडून अंदाजे ४० ते ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रतिदिन १ सहस्र १०० टन कचर्‍याची निर्मिती !

कचरा अल्प करणे आणि कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे यांविषयी नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने ओल्या कचर्‍याचा उपयोग करून नैसर्गिक खते सिद्ध करण्यासाठीही नागरिकांना प्रशिक्षित करणे आवश्यक !

वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ५८५ लोकांना अटक !

भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !

पिलेश्वरीनगर (सातारा) येथील वसाहतीजवळ कचर्‍याचे साम्राज्य !

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे चौकाचौकांत कचर्‍याचे ढीग पसरले असून श्वानांच्या उपद्रवामुळे हा कचरा रस्त्यावर विखुरला गेल्यामुळे दुर्गंधी येत आहे.

भारताच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’वरील बंदीचे जगभरातून स्वागत !

भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्र आहे कि कचरा टाकण्याचे मैदान ! – स्वाती शिंदे, नगरसेविका

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ परिसरात महापालिकेने कचर्‍याचे मैदान केले असून प्रभागांतील कचरा येथे टाकला जातो. यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारात टाकू नये !

महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईची मोहीम चालू आहे. प्रत्येक चेंबरमधून प्लास्टिक कचरा निघत असल्यामुळे नागरिकांनी तो गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

१ जूनपासून ६ प्रकारे कचरा वर्गीकरण न केल्यास सोलापूर येथे दंडात्मक कारवाई होणार !

घरगुती कचर्‍याचे विविध ६ प्रकारचे वर्गीकरण न केल्यास १ जूनपासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.