सातारा, २२ ऑगस्ट (वार्ता.) – काही मासांपूर्वी सातारा शहराची सीमावाढ झाली असून शहरालगतची काही उपनगरे सातारा नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. असे असले, तरी सातारा नगरपालिकेने समाविष्ट उपनगरांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे शहराजवळील पिलेश्वरीनगर येथील कॅनॉलजवळ कचर्याचे ढीग साठून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे चौकाचौकांत कचर्याचे ढीग पसरले असून श्वानांच्या उपद्रवामुळे हा कचरा रस्त्यावर विखुरला गेल्यामुळे दुर्गंधी येत आहे.