कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण !

 

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याचे संकेतस्थळावरून दिसून येते. २६ ते ३० ऑगस्ट या काळात अनेक गाड्यांच्या विविध श्रेणींतील सर्व आसने आरक्षित झाली आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा सूची अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे. ३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे.